नाशिक- केंद्र सरकारने इंधनावर करवाढ केल्यानंतर ग्राहकांवर त्याचा बोजा येण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु कराचा बोजा सहन करताना ग्राहकांना कुठलाही अतिरिक्त भार दिला जाणार नसल्याचे कंपन्यांनी जाहीर केले आहे. मात्र गेल्या काही कालावधीत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण होऊनही ग्राहकांना अद्याप इंधनाचे दर कमी होण्याची अपेक्षा लागून राहिली आहे.