सिन्नर- नाशिक-पुणे महामार्गावर पाथरे फाट्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांतून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीस ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चार लाखांवर रकमेचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे..पोलिस निरीक्षक राजेंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक नवनाथ सानप, हवालदार नवनाथ टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रकाश कासार यांच्या पथकाने पाथरे फाटा येथे सापळा रचला होता. राखाडी रंगाच्या कारमधून चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली होती. .होंडा सिटी कारमधून (एम.एच.०१, व्ही. ए. १८४६) संशयित कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण (२८, रा. घनसोली, ता. जि. ठाणे, ह.मु. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहता), किशोर भाऊसाहेब खरात (१९, सावळीविहीर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) येताच त्यांना ताब्यात घेतले. संशयितांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अजय भोसले (रा. श्रीरामनगर, शिर्डी) याच्यासह सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्ग टोल परिसरात, शिर्डी मार्गावर व सिन्नर शहरातील रोडच्या कडेला उभ्या ट्रकांचे डिझेल काढल्याची कबुली दिली. यात सिन्नर व वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयितांकडून सहा बॅरलमधून १४ हजार १०५ रुपयांचे १५५ लिटर डिझेल, होंडा सिटी कार ताब्यात घेतली. यातील कृष्णा चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून या अगोदर कौपरखैराणे, शिवाजीनगर, अंबरनाथ ईस्ट, तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली..BSNL Recharge Plan : BSNL ने वाढवलं जिओ, एअरटेलचं टेन्शन! आणला अनलिमिटेड कॉलिंग-SMS रिचार्ज प्लॅन; येणार फुल रेंज, किंमत फक्त....सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.