Nashik Crime News : गोळीबार प्रकरणातील फरारी संशयित जेरबंद; गावठी पिस्तूलही जप्त

Suspect arrested
Suspect arrestedesakal

नाशिक : जानेवारी महिन्यात इंदिरानगर बोगद्याजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोन महिन्यांपासून फरारी असलेल्या मुख्य संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सुनील देविदास चोरमारे (३२, रा. राणेनगर), असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Fugitive suspect in shooting case jailed Gavathi pistol seized Nashik Crime News)

४ जानेवारीला मध्यरात्री अविनाश विक्रम टिळे (रा. पंचवटी) हे संशयित चोरमारेचे मित्र असून, त्याची वापरास घेतलेली दुचाकी (एमएच- ०१- बीजी ५८८१) परत करण्यासाठी इंदिरानगर बोगद्यासमोरील साईनाथ चौफुलीकडे जाणाऱ्या रोडवर आले.

या वेळी संशयित चोरमारे याने टिळे यांना पाहून गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. तर, संशयित जग्गू सांगळे, राज जोशी यांनी, ‘तुला जिवंत सोडत नाही’ म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Suspect arrested
Crime News : आधी चार बायका सोडून गेल्या; पाचवीने वैतागून प्रायव्हेट पार्ट कापला

संशयित जग्गू सांगळे यास पोलिसांनी अटक केली. परंतु मुख्य संशयित चोरमारे पसार झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई नाका पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, मुंबई नाक्याचे सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सूरी यांना संशयित चोरमारे महामार्गावरील हॉटेल एम्पायरजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून संशयित चोरमारे यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही हस्तगत करण्यात आली आहे. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे, सहायक निरीक्षक साजिद मन्सूरी, उपनिरीक्षक श्रीवंत, पाटील, टेमगर, जाधव, नाकोडे, गुंजाळ यांनी बजावली.

Suspect arrested
Pune Crime News: बेकायदा अफूची शेती करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com