गजानन महाराज मंदिराच्या व्यवस्थापनावर संशोधन

गजानन महाराज मंदिराच्या व्यवस्थापनावर संशोधन
Published on: 
पान १ वर, अँकर शक्य --- NSK26H31409 श्रीक्षेत्र शेगाव : गजानन महाराज मंदिर. --- NSK26H31411 : डॉ. योगेश खडके --- श्रद्धा, तंत्रज्ञान अन्‌ शाश्‍वत व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उपशीर्षक डॉ. योगेश खडके यांचे संशोधन; गजानन महाराज मंदिरासंबंधी पदव्युत्तर पीएच.डी. सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थानातील शिस्त, स्वच्छता, गर्दीचे नियोजन एकूणच व्यवस्थापनातील एक आदर्श मॉडेल आहे. आता संस्थानच्या एकूणच व्यवस्थापन कार्यप्रणालीवर जळगावातील सुपुत्राने पदव्युत्तर पीएच.डी.तील संशोधन करीत श्रद्धा, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांच्या समन्वयातून या मंदिर संस्थानची आदर्श व्यवस्थापन प्रणाली जगासमोर मांडली आहे. डॉ. योगेश खडके मूळ जळगावातील शिव कॉलनीतील रहिवासी. जिल्हा दूध संघातील निवृत्त अधिकारी डॉ. पद्माकर खडके यांचे पुत्र. सध्या योगेश खडके उत्तर प्रदेश शासनाच्या यूपीएसटीसी- सस्टेनेबिलिटी सेल येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानातील एकूणच शिस्त, गर्दी व्यवस्थापन, अन्नछत्र आणि त्याचे नियोजन, मंदिर व्यवस्थापनातील सूक्ष्म बाबींचा विचार करून केलेले नियोजन देशभरातील मंदिर आणि विविध व्यवस्थापन संस्थांच्या दृष्टीने कौतुकासह अभ्यासाचा विषय बनला आहे. श्री. खडके यांनी ‘सिस्टम्स डायनॅमिक्स’ दृष्टिकोन : श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथील पर्यावरणीय, कार्यान्वयनविषयक, शैक्षणिक आणि सामाजिक एकात्मता’ या विषयावर संशोधन केले. त्यांना त्याबद्दल एसआरयू विद्यापीठाने (वरंगल, तेलंगणा) ‘शाश्‍वत मंदिर विकास व्यवस्थापन’ या विषयात पोस्ट डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. चौकट या गोष्टींवर दिला भर डॉ. योगेश खडके यांनी या विषयावर संशोधन करताना संस्थानातील पारदर्शक देणगी व्यवस्थापन, त्यासाठी डिजिटल दान प्रणाली, ई- पावती, सुरक्षित डिजिटल नोंदणी, तसेच भक्तांची सुरक्षा व गर्दीचे व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, ऊर्जेची बचत यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्यासारख्या बाबींवर भर दिला आहे. जो देशातील अन्य मंदिरे, धार्मिक स्थळांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. असे आहेत निष्कर्ष - ‘एआय’ आधारित पारदर्शक देणगी व्यवस्थापन - डिजिटल दान प्रणाली, ई-पावती आणि सुरक्षित डिजिटल नोंदणी - ‘एआय’ आधारित आर्थिक विश्लेषणाद्वारे अनियमित व्यवहारांवर लक्ष - ‘एआय’ आधारित भाविक सुरक्षा व गर्दी व्यवस्थापन - ‘एआय’ कॅमेरे, सेन्सर्स आणि रिअल-टाइम डेटा वापरून गर्दीचे नियोजन करणे - डिजिटल दर्शन स्लॉट, स्मार्ट रांग व्यवस्था आणि आपत्कालीन मार्ग व्यवस्थापन - ‘एआय’ आधारित पूर्वसूचना प्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे - ‘एआय’ आधारित सुरक्षा व संशयास्पद हालचालींचे निरीक्षण - सौरऊर्जा, ऊर्जा बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोजना - निर्माल्यापासून कंपोस्ट, अगरबत्ती आणि जैविक उत्पादने तयार करणे - प्लॅस्टिकमुक्त मंदिर परिसर आणि शून्य-कचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे - मंदिर परिसरातील जलस्रोतांचे स्मार्ट मॉनिटरिंग - मंदिराचा कार्बन फूटप्रिंट मोजणे आणि कमी करण्यासाठी उपाययोजना करणे --- कोट भविष्यातील भारतीय मंदिर केवळ आध्यात्मिक केंद्र न राहता ‘एआय’-सक्षम, पर्यावरणपूरक, पारदर्शक, सुरक्षित आणि समाजसेवेचे शाश्वत मॉडेल बनू शकते. श्रद्धा, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधून भारतीय मंदिरे जगासाठी एक आदर्श व्यवस्थापन प्रणाली निर्माण करू शकतात. - डॉ. योगेश खडके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com