SKD26B04321
विरदेल : ऐतिहासिक विहिरीची स्वच्छता करताना ग्रामस्थ.
--------
विरदेलमध्ये ऐतिहासिक विहिरीची स्वच्छता
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ३ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजना अभियानअंतर्गत ‘रिफॉर्म उत्सव’च्या अंमलबजावणीसाठी गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २) विरदेल (ता. शिंदखेडा) येथे ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रशासक तथा विस्तार अधिकारी गणेश कृष्णा वेताळे होते.
ग्रामसभेस ग्रामपातळीवरील अधिकारी व कर्मचारी, आजी- माजी सरपंच, आजी- माजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिलांची उपस्थिती होती. लिपिक जितेंद्र पेंढारकर यांनी ग्रामसभेचे सचिव म्हणून कामकाज पाहिले. ग्रामसभा संपल्यानंतर ‘सेवा संकल्प अभियान’ व स्वच्छता दिनानिमित्त गावातील ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर स्वच्छ करण्यात आली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली ही ऐतिहासिक विहीर स्वच्छ करून परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता मोहिमेत प्रशासक तथा विस्तार अधिकारी गणेश वेताळे, माजी सरपंच सतीश बेहरे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल रायसिंग, रोजगार सेवक नरेंद्र धनगर यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ऐतिहासिक वास्तूचे जतन व गावातील स्वच्छतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.