फोटोसह वृत्त आवश्यक

फोटोसह वृत्त आवश्यक
Published on: 
पान देन सेकंड मेन 06963 सटाणा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीचे निषेधार्थ महामार्गावरील खड्ड्यात असलेल्या दगडाला हार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन छेडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे व पदाधिकारी. सटाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ''गांधीगिरी'' सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कर्मचाऱ्यांना फराळ देत रस्त्यावरील खड्ड्यांना घातले हार सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १३ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी नेहमीच अनुपस्थित राहणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि विकासकामाच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) अनोख्या ''गांधीगिरी'' आंदोलनाद्वारे जोरदार निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी कार्यालयात पोहोचले असता, तिथे केवळ दोन चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित असल्याचे आणि विभागांतर्गत अन्य कार्यालयांना कुलूप असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. त्यानंतर सटाणा-मालेगाव रस्त्यावरील रावळगाव फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतील उखडलेल्या दगडांना पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध केला. तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर विभागाच्या मुख्य अभियंत्यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गासह विविध राज्यमार्गांच्या कामांदरम्यान करण्यात आलेल्या अंदाधुंद वृक्षतोडीच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड नेमकी कुठे आणि किती प्रमाणात करण्यात आली, याची सार्वजनिक माहिती देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात कागदावर दाखवलेली नवीन वृक्षलागवड कुठेही जमिनीवर दिसत नसल्याचा गंभीर आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला. या लक्षवेधी आंदोलनात संदीप भामरे, भारत खैरनार, तालुका कार्याध्यक्ष किशोरभाऊ ह्याळीज, दिगंबर तात्या सोनवणे, तुषार वाघ, आर. टी. सोनवणे, संदीप पाटील रौदळ, रणधीर मोरे, राजेंद्र रौंदळ, किरण पाटील, वाडीलाल चव्हाण, देवेंद्र पवार, हेमंत मगर, प्रशांत देवरे, नंदकिशोर सोनवणे, सोनू चंद्रात्रे, दादाजी खैरनार, दिलीप खैरनार, नाना ह्याळीज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ---- प्रमुख मागण्या तालुक्यात ठिकठिकाणी अनावश्यक गतिरोधक तातडीने हटविण्यात यावेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील ऑनलाइन निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकता आणावी. कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी कामांची गुणवत्ता व देखरेख यंत्रणेत तातडीने सुधारणा करावी. अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.