मेन
फोटो : B18046 , B18049
नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्र केसरीचा मानकरी गणेश अहिरे यांचा सन्मान करताना कुस्तीगीर परिषदेचे सचिव गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, कोंडाजी ढोमसे आदी. दुसऱ्या छायाचित्रात स्पर्धेतील चुरशीचा क्षण (छायाचित्र अंबादास शिंदे)
--
उत्तर महाराष्ट्र केसरीची गदा मोठ्या भावाच्या हाती
सटाण्याचा गणेश अहिरे मानकरी; अंतिम लढतीत लहान भाऊ अनिलवर मात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २ : सटाणा येथील गणेश अहिरे याने १५ व्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली. अंतिम लढतीत त्याने आपलाच लहान भाऊ अनिल अहिरे याच्यावर मात केली. दोन्ही भावांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्याने सटाणा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. अंतिम लढतीत मोठ्या भावाने लहान भावावर मात करताच उपस्थित कुस्तीप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट केला. नीलेश उचाळे याने तिसरा क्रमांक पटकाविला. विजेत्या गणेश अहिरे याला रोख ५१ हजार रुपये आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार आणि खुल्या गटातील कुस्त्या रंगल्या. गणेश आणि अनिल हे दोन्ही मल्ल साकूर फाटा येथील गुरू हनुमान आखाड्याचे वस्ताद ज्ञानेश्वर शिंदे यांचे शिष्य आहेत. उत्तर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा ज्ञानेश्वर शिंदे यांच्यातर्फे देण्यात आली.
या वेळी अयोध्येतील हनुमानगढीचे महंत संजय दासजी महाराज, श्रीमहंत ज्ञानदासजी महाराज, पश्चिम बंगालमधील गंगासागर येथील कपिल मुनी आश्रमाचे प्रमुख महंत हेमंत दास महाराज, नगरसेवक दिनकर पाटील, प्रभाग सभापती रमेश धोंगडे, कुस्तीगीर परिषदेचे सचिव गोरखनाथ बलकवडे, अजित गायकवाड, जयश्री गायकवाड, सूर्यकांत लवटे, उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, कोंडाजी ढोमसे, भगवान दोंदे, रवींद्र मोरे, अंबादास कस्तुरे, नामदेव गायधनी, नामदेव गवळी, आयोजक ज्ञानेश्वर बोराडे, ईश्वर शिरसाठ, दिलीप गायधनी, संदेश भागवत आणि बाळासाहेब जुंदरे आदी उपस्थित होते. पंच म्हणून अंबू पवार, ज्ञानेश्वर शिंदे, मधुकर वाघ, चेतक बलकवडे, दिलीप सोनवणे, बाळू बिन्नर, किरण मते, गणपत चुंबळे, रमेश बोराडे आणि रघुनाथ गायकवाड यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन किरण मते यांनी केले.
---
निकाल पुढीलप्रमाणे
वजनगट प्रथम द्वितीय तृतीय
२५ किलो शिवांश गुडघे, अनिकेत गटकळ, आरव सोनवणे
३० किलो अर्णव भुसारे, विनोद गुळवे, वीर बढाले
३५ किलो यश गवळी, कृष्णा डोनर, अबू बकर शेख
४० किलो मिहीर औशीकर, साहिल झाडे, शंतनू गायकवाड
४५ किलो स्वप्निल गुरकुले, शुभम झाडे, रुद्र बढाले
५० किलो सार्थक माळसुरे, मंदार म्हस्के, विष्णू जाधव
५५ किलो जयेश बोराडे, सागर भले, सागर गायकवाड
६० किलो दादासाहेब आचपळे, शेख अमन, बाळासाहेब कांदे
६५ किलो शुभम आचपळे, यश ढाकणे, युवराज वाघ