फोटो-27361
येवला : विणकर महिलांना धनादेशाचे वितरण करताना नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मनोज दिवटे आदी.
विणकर महिलांना गणेशोत्सव भत्ता!
येवल्यात पात्र महिलांना धनादेशांचे वितरण; वस्त्रोद्योग धोरणांतर्गत मदत
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ६ : शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत हातमाग विणकर महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या गणेशोत्सव भत्ता योजनेचे धनादेश वितरण करण्यात आले. या वेळी तब्बल १२० विणकर महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात हा कार्यक्रम झाला. योजनेंतर्गत पात्र हातमाग विणकर महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. प्रादेशिक उपायुक्त दीपक खांडेकर यांच्या सूचनेनुसार झालेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी, शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते पात्र महिलांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
प्रविण पहिलवान,जितेंद्र पहिलवान, संतोष भरते, जितेंद्र मिसाळ, चेतन हंगे, दत्ता मुंगीकर, चंचल वायडे, संध्या कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला हातमाग विणकर महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.हातमाग विणकर महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात मिळालेला १५ हजार रुपयांचा भत्ता कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरणार असल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली.
........