फोटो -NSK26H34087
नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या आधार आश्रमातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसोबत गणेश गिते, आमदार गोकूळ गिते व मान्यवर.
गणेश गिते यांच्या जन्मदिनी सामाजिक उपक्रम
--------------------------------------
अभीष्टचिंतन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३० : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचा वाढदिवस शुक्रवारी (ता.३०) औदुंबर लॉन्स येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी राजकीय, सामाजिक, सहकार, व्यापार, बांधकाम, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गिते यांच्या मातोश्री सुनीता बबनराव गिते व भगिनी योगिता काकड यांच्या हस्ते औक्षण करून झाली. यावे ळी त्यांच्यासोबत वडील बबनराव गिते, चुलते दिगंबर गिते, विधान परिषदेचे आमदार गोकूळ गिते, नगरसेविका दीपाली गिते, तळवाडे विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालिका उज्ज्वला गिते, प्रा. शरद काकड, डॉ. नितीन गिते, उदय घुगे, उदय सांगळे, नरेंद्र गिते, अयान गिते, चैतन्य गिते, विठ्ठल गिते, सुयश काकड उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, अनिल कदम, नामको बँकेचे माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, नगरसेवक दिनकर पाटील, भाजपचे शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा, के. व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उदय सांगळे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, नगरसेविका रंजना भानसी, भारती ताजनपुरे, कोमल मेहरोलिया, उषा बेंडकुळे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, कमलेश बोडके, राहुल दिवे, प्रशांत दिवे, प्रमोद पालवे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, भाऊलाल तांबडे, सचिन ढिकले, बापू पिंगळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इन्फो...
१०४ पिशव्या रक्त संकलित
या प्रसंगी मेट्रो रक्तपेढीच्या सहकाऱ्याने व आयोजकांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०४ पिशव्या रक्त संकलित झाले. यावेळी कार्यकर्त्यांबरोबरच अनेक मान्यवरांनी देखील रक्तदान केले.
इन्फो...
आधार आश्रमातील मुलांकडून शुभेच्छा
त्र्यंबकेश्वर रोडवरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या आधार आश्रमातील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भक्तीगीते, भावगीते, तसेच जोगवा व प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच गिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.