नाशिक: लाडक्या गणरायाचे स्वागत अवघ्या काही तासांवर आलेले असताना, शहरातील गणेश मंडळांकडून परवानग्यासाठी लगबग गणेश चतुर्थीपर्यंत सुरूच होती. मंगळवारी (ता.२६) सायंकाळपर्यंत शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील ३९१ तर महापालिका प्रशासनाकडून ७०८ पैकी ४५५ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. यात बुधवारपर्यंत (ता. २७) वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी शहरात सुमारे साडेसातशे सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.