जुने नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या नंबरचा असलेला गोंधळ सुटता सुटत नाही. आतापर्यंत तीन ते चार बैठका होऊनही त्यावर तोडगा निघालेला नाही. रविवारी (ता.३१) सायंकाळी झालेल्या बैठकीतही मंडळाचे एकमत न होता काही प्रमाणात वाद झाल्याचे बघायला मिळाले.