जुने नाशिक: गणेशोत्सवानिमित्त बाजारात आलेल्या आकर्षक गणेशमूर्ती नागरिकांना भुरळ घालत आहेत. गणेशभक्तांकडून मूर्ती बुक करण्याची लगबग वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्तींचे उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने यावर्षी मूर्तींची कमतरता भासण्याची शक्यता आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.