Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली

Preparations for installation of Lord Ganesha in Municipal East Divisional Office Premises
Preparations for installation of Lord Ganesha in Municipal East Divisional Office Premisesesakal

जुने नाशिक : बाप्पाच्या आगमनाचा नागरिक आणि सार्वजनिक मंडळांमधील उत्साह बघता प्रशासकीय यंत्रणा विविध कामासाठी सरसावली आहे. बंदोबस्त तैनात करण्यापासून तर मिरवणूक मार्गाची डागडुजीपर्यंत विविध कामांना सुरवात केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या जात आहे. (Ganeshotsav 2022 Administration Ready for Bappa Arrival Nashik Latest Marathi News)

गणेशोत्सवात विविध प्रशासकीय यंत्रणांना सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त राहावे लागते. यंदा दोन वर्षानंतर जोमात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी दुप्पट वाढली आहे. पोलिस विभागाकडून मंडळ, शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी पोलिसांकडून भेट देत त्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे महापालिकेकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

मंडळाच्या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता तसेच घंटागाडी सुविधा उपलब्ध केली आहे. आरास पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अतिक्रमण काढणे, मिरवणूक मार्गातील वृक्षांची छाटणी, खड्डे बुजविणे, परवानगीसाठी एक खिडकी माध्यमातून परवानगी देण्याचे कामे महापालिकेकडून केली जात आहे.

त्याचप्रमाणे वीज वितरण विभागाकडून अधिकृत वीज जोडणी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देत, शासकीय नियमानुसार तात्पुरती वीज जोडणी मंडळांना करून दिली जात आहे.

Preparations for installation of Lord Ganesha in Municipal East Divisional Office Premises
Ganeshotsav 2022 : NMCकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

शासकीय कार्यालयात बाप्पांची स्थापना

शासकीय कर्मचाऱ्यांमध्येदेखील गणेशोत्सवानिमित्त उत्साह असल्याचे दिसून येत आहे. विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात गणपती बाप्पा स्थापनेची तयारी सुरू आहे. महापालिका मानाचा गणपती स्थापनेचीदेखील पूर्व विभागीय कार्यालयात आवारात जोरदार तयारी सुरू सुरू आहे.

"सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासह शासकीय नियमात राहून गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे." - दत्ता पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

"रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह अतिक्रमणाची समस्या सोडवत गणेश मंडळास आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची समस्या जाणवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महापालिकेतर्फे करण्यात येत आहे." - मदन हरिश्चंद्र, विभागीय अधिकारी

Preparations for installation of Lord Ganesha in Municipal East Divisional Office Premises
Dinesh Bagul Bribe Case : ‘वरदहस्ता’ मुळे बागूल ‘आदिवासी’त मोकाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com