Ganeshotsav 2022 : नाशिकचे बाप्पा निघाले फ्रान्सला

pooja bhalerao taking her idol
pooja bhalerao taking her idolesakal
Updated on

नाशिक : मुळ जेल रोड येथील रहिवासी आणि फ्रान्स येथील नागरिक पूजा भालेराव यांनी फ्रान्सला गणेशोत्सवासाठी येथून श्रीगणेशाची मुर्ती नेली. सहा वर्षापासून त्या फ्रान्सला राहत असून, तेथे मराठी पद्धतीने गणेशोत्सव आणि मराठी नागरिकांचे स्नेहमिलन करतात. (Ganeshotsav 2022 Bappa idol transported from Nashik to France by devotees nashik latest marathi news)

मूळच्या नाशिकच्या माहेर असलेल्या पूजा भालेराव आयटी इंजिनिअर असून गेल्या सात वर्षापासून त्या फ्रान्सला लिओन सिटी येथे राहतात. तेथे सहा वर्षापासून त्यांचे कुटुंब गणेशोत्सव साजरा करते.

मात्र, फ्रान्सला गणेशमूर्तीसह पूजा साहित्याचा वाणवा असल्याने त्यासाठी दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी माहेरी नाशिकला येतात. महाराष्ट्रातून त्या मुर्ती नेतात. यंदा त्यांनी माहेर नाशिकच्या मुर्ती आर्कषक असल्याने नाशिकला जेल रोड येथून साई ऋचा क्लासचे व साईबाबा आर्ट्स संचालक राहुल रत्नाकर बाकरे यांच्याकडून त्यांनी श्रीगणेशाची मुर्ती घेतली.

श्री. बाकरे यांच्याकडील गणेशमूर्ती आर्कषक असल्याने आवडली. त्यामुळे त्यांनी फ्रान्सला गणेशोत्सव साजरी करण्यासाठी मुर्ती असल्याचे चित्र पूजा भालेराव यांनी सांगितले.

pooja bhalerao taking her idol
Nashik : 'SMBT'त वळताय परदेशी विद्यार्थ्यांची पावले

फ्रान्सला गणेशोत्सवाविषयी ‘सकाळ’ ला त्यांनी सांगितले, की फ्रान्सला मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. यानिमित्ताने मराठी कुटुंब एकत्र येऊन मराठी सण संस्कृती जोपासली जात आहे.

त्यात साधारण श्रावण महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर मराठी सण उत्सव सुरू होत असल्याने त्यापूर्वी महाराष्ट्रात येऊन सण उत्सव, पूजा साहित्याची तयारीसाठी त्या नियमित येतात. आपल्या भागापासून दूर गेल्यानंतर आपल्या सण उत्सवाची उणीव भासू लागते. सांस्कृतिक एकटेपण टाळण्यासाठी मराठी सण- उत्सव विदेशात मोठ्या प्रमाणात साजरा करतात, असे त्यांनी सांगितले.

pooja bhalerao taking her idol
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com