Ganeshotsav 2022 : मिरवणुकीत भाविकांचा जल्लोष..!

Nashik Ganeshotsav 2022
Nashik Ganeshotsav 2022 esakal

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. मिरवणुकीत सहभागी होण्याविषयी तरुणाईमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला.

यावेळी ढोल ताशाचा झालेला गजर भाविकांचे लक्ष वेधत होता. तर डीजेच्या तालावर तिरकस तरुणाईने एकच जल्लोष केला. पोलिसांचाही चोख बंदोबस्त मिरवणूक मार्गावर ठेवण्यात आलेला आहे. (Ganeshotsav 2022 Devotees cheer in procession on Anant Chaturthi Nashik Latest Marathi News)

ढोल ताशाचा झालेला गजर भाविकांचे लक्ष वेधत होता
ढोल ताशाचा झालेला गजर भाविकांचे लक्ष वेधत होताesakal
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.esakal

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी ११ ची वेळ दिलेली असताना सुमारे पावणे बाराला मिरवणुकीस प्रारंभ झाला . यावेळी मंत्री श्री महाजन यांनी ढोल ताशा वाजवत उत्साहात सहभाग नोंदवला.

महापालिकेच्या गणेश मंडळाला मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने भाविकांमध्ये उत्साह जाणवत होता. काही मिनिटांसाठी पावसाने देखील हजेरी लावली , परंतु भाविकांचा उत्साह वृद्धिंगत होत चालला होता.

esakal
सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक मेन रोड परिसर परिसरापर्यंत पोहोचलेली होती
सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक मेन रोड परिसर परिसरापर्यंत पोहोचलेली होतीesakal

सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक मेन रोड परिसर परिसरापर्यंत पोहोचलेली होती. यावेळी वेगवेगळ्या सामाजिक संस्था मंडळांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी भाविक व मंडळाचे स्वागत केले जात होते. तसेच ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता.

esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com