Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासाठी लाइटिंगचा झगमगाट

Various lighting items sold in the market for Bappa's arrival
Various lighting items sold in the market for Bappa's arrivalesakal

जुने नाशिक : गणेशोत्सवात आरास उभारणीसाठी आकर्षक आणि विविध प्रकारच्या लायटिंगचा विशेष वापर केला जातो. विशेषतः छोटे मंडळ आणि घरगुती गणेशोत्सवात लायटिंगचा आवर्जून वापर होतो. अशाच रंगबिरंगी देशी- विदेशी आकर्षक लायटिंग बाजारात दाखल झाल्या असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आकर्षित करत आहे. (Ganeshotsav 2022 lighting materials in market for decoration Nashik latest marathi news)

पूर्वी मास्टर बल्बच्या माळीच्या साह्याने सजावट केली जात होती. त्या कुठेतरी खर्चिक असल्याने काही वर्षापासून स्वस्तात मिळणाऱ्या चायना लायटिंगला मागणी वाढली होती. आकर्षक आणि विविध प्रकारच्या आकारामध्ये लायटिंग येत असल्याने नागरिक आकर्षित होत होते. सध्यादेखील लायटिंगच्या माध्यमातून सजावट करण्यावर भर दिला जातो.

त्यानिमित्ताने यंदादेखील विविध प्रकारच्या रोषणाईच्या माळी, तोरण, झुंबर, फुले, परदा, फोकस, चक्र, कंदील, समई, दिवे अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. या वर्षी चायना लायटिंग पेक्षा देशी बनवतीच्या एलईडी लायटिंगसह अन्य विविध वस्तूंना अधिक मागणी आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाईमुळे २५ ते ३० टक्के दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. या वर्षी लायटिंग असलेले गणपती तोरण, पाण्यातील दिवे, लायटिंग असलेले सदाफुलीचे विविधरंगी फुले पहिल्यांदाच विक्रीस आले आहे.

Various lighting items sold in the market for Bappa's arrival
Nashik : दगडफेक प्रकरणी 18 संशयित ताब्यात

देशी लायटिंगला मागणी

चायना लायटिंगवर गेल्या दोन वर्षापासून नागरिकांकडून बहिष्कार टाकण्यात येत असल्याने देशी बनावटीच्या लायटिंगला मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातच तयार झालेले विविध प्रकारच्या आकाराच्या वस्तू आणि लायटिंग मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. सुमारे ६० ते ७० टक्के देशी माल बाजारात विक्रीस आला आहे.

"यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. दर वाढले असून, आवक कमी असल्याने शेवटच्या दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. "- श्रेयस भालेराव, विक्रेता

असे आहे दर

एलईडी लायटिंग माळ ७० ते ५००

स्टार आकाराच्या लायटिंग ३०० ते ३५०

गणपती तोरण ६५०

समई २०० ते ३५०

सदाफुली फूल लड ३५०

पार (फोकस) लाइट ४०० ते ७५०

वॉटर फॉल लायटिंग परदा ६५०

लायटिंग पाने असलेली वेल १०० ते ६५०

देशी एलईडी लायटिंग माळ ९० ते ३००

रोटेटिंग लॅम्प १५०

पाण्यातील दिवे ३०० रुपये डझन

पणत्या एक ५० रुपये

फोकस १२०

लेसर लायटिंग ५५०

Various lighting items sold in the market for Bappa's arrival
जानोरीच्या जिम्नॅस्टिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक मदतीची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com