Ganeshotsav 2022 : शहरात खरेदीदारांत उत्साह; गर्दीचा उच्चांक

Crowd in market
Crowd in marketesakal

नाशिक : गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ३०) खरेदीदारांत मोठा उत्साह होता. त्यामुळे मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, दहिपूल या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यातच मोठ्या संख्येने दुचाकींसह चारचाकी वाहने रस्त्यावर आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली. (Ganeshotsav 2022 Shoppers excitement in city peak of rush Nashik Latest Marathi News)

दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच हरितालिकेच्या औचित्य साधत महिलांसह अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत सगळीकडेच गर्दीचा महापूर दिसून आला. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, कानडे मारुती लेन, बोहोरपट्टी, शालिमार, दहिपूल भागात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती, अशी परिस्थिती होती.

खरेदीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले नागरिक व वाहने यामुळे सर्वच भागात वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली. अगदी गल्ली बोळातही वाहतुकीची कोंडी झाली होती. यावरून गर्दीचा अंदाज यावा. पोलिस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी आवाहन करूनही मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा भागातून शहराच्या मध्यवर्ती भागात चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली.

"सणासुदीच्या काळात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिळक पथ सिग्नल, शालिमार, रविवार पेठ या भागात शहराच्या मध्यवर्ती भागात चाचारचाकी वाहनांना मज्जाव केल्यास वाहतुकीच्या कोंडीस आळा बसेल." - कृष्णा नागरे, सराफ व्यावसायिक

Crowd in market
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com