नाशिक रोड: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असून, गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारखान्यात कारागीर मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना दिसत आहेत. यात महिला कारागिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यंदा गणेशोत्सवात किमती वाढल्याने अनेकांकडून छोट्या मूर्तींना पसंती दिली जात आहे.