जुने नाशिक: गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखावे साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. काही मंडळे कृत्रिम देखावे उभारतात, तर काही मंडळांकडून जिवंत देखावे सादर केले जातात. सध्या या दोन्ही प्रकारच्या कामांसह जिवंत देखाव्याचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचा जोरदार सराव सुरू आहे.