नाशिक: आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी महापालिकेतर्फे मंडप धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याअनुषंगाने मंडप, स्टेज किंवा कमान उभारणीस परवानगीसंबंधी येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक महिना अगोदर पूर्वपरवानगीची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. उत्सवाच्या सात दिवस अगोदर परवानगीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. परवानगीसाठी विभागीय कार्यालयांमध्ये एकखिडकी योजनेची व्यवस्था आहे.