निखिल रोकडे : नाशिक- अवैध दारू विक्रीला अटकाव करण्यात यंत्रणेला यश येत नसल्याने नाशिकमध्ये अल्पवयीनांच्या गुन्हेगारी टोळ्या फोफावल्या आहेत. एकेकाळी मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीतून निर्माण झालेल्या टोळीयुद्धासारखे स्वरूप नाशिकला येते की काय अशी स्थिती सध्या नाशिककरांना पाहायला मिळत आहे.