उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते समांतर गंगापूर रोडचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते समांतर गंगापूर रोडचे भूमिपूजन
Published on: 
एन्कर -------------- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या समांतर गंगापूर रोडचे भूमिपूजन नाशिक दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : गंगापूर रोडला समांतर ठरणाऱ्या कॅनॉल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी (ता. २६) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यासह त्यांच्या नाशिक दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याची माहिती उपमहापौर विलास शिंदे यांनी दिली. गंगापूर रोड परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता पर्यायी मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही या मार्गाचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर समांतर कॅनॉल रोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर रोड परिसरातील तिरुमला हाइट्स, पाइपलाइन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रकल्प शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, गटनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर व प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार व पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. -----------------चौकट त्र्यंबकेश्‍वर दर्शनाने दौऱ्याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने होणार असून, यावेळी साधू-संत-महंतांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता हरसूल येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दीपावलीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता समांतर गंगापूर रोड प्रकल्पाचे भूमिपूजन, तर दुपारी ३ वाजता मविप्र संस्थेच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. -----------कोट------------ समांतर गंगापूर रोड प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी दूर होईल, नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल. - विलास शिंदे, उपमहापौर, नाशिक. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com