गंगापूर धरणातील मृत पाणीसाठा उचलणार

गंगापूर धरणातील मृत पाणीसाठा उचलणार
Published on: 
टूडे साठी ------------- गंगापूर धरणात चर खोदाईचा मार्ग सुकर अटी शिथिल केल्याने निविदा प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : उपसा केंद्रापर्यंत गंगापूर धरणाच्या मध्यभागी असलेले पाणी आणण्यासाठी चर खोदली जाणार आहे. यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु अटी व शर्तींमुळे प्रतिसाद मिळतं नव्हता. आता नागरी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या अनुभवाची अट वगळण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेत काम करणाऱ्या कुठल्याही मक्तेदाराला निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. परंतु यंदा दुष्काळ व सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या तीन महिन्यांच्या काळात गोदावरी नदी प्रवाही राहण्यासाठी व संभाव्य पाणी संकटाचा सामना करण्यासाठी धरणात चर खोदली जाणार आहे. या माध्यमातून मृतसाठ्याचा पुरेपुर वापर करण्याचा महापालिकेचा हेतू आहे. गंगापूर धरण मातीचे असल्याने स्फोटकांचा वापर करता येत नाही. त्यामुळे विशेष तंत्रज्ञान वापरून खडक फोडला जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. चर खोदाईचा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने ११.६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला. आयुक्तांच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रियेत फक्त नागरी क्षेत्रात काम केलेल्या कंपनीला काम देण्याची प्रमुख अट होती. त्यामुळे निविदा पूर्वबैठकीला मक्तेदारांनी प्रतिसाद दिला नाही. वांरवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पाणीपुरवठा विभागाने निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल केला आहे. कोणत्याही क्षेत्रात पाणीपुरवठाविषयक काम केलेल्या मक्तेदाराला काम दिले जाणार असल्याची अट समाविष्ट करण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गुरूवारी (ता. २२) निविदा पूर्वअर्हता (प्री-बीड) बैठक बोलाविण्यात आली आहे. मक्तेदारांच्या सूचनेनंतर निविदा प्रक्रिया अंतिम केली जाणार आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com