नाशिक- गंगापूर रोडवरील जेहान सिग्नल येथील नेर्लीकर चौकातील वाइन शॉपवर दोघा संशयितांनी मोफत मद्य न दिल्याने दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या घटनेत शॉपचे मोठे नुकसान झाले. पण यामुळे शार्टसर्किट होऊन आगीची घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात खंडणीसह विविध गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक झाली.