नाशिक: गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सुमारे १ लाख ५५ हजार ५८५ किमतीचा पाच किलो गांजासह एकास अटक करण्यात आली. अनिल गुंजाळ (रा. पेठगल्ली, गंगापूर गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूर पोलिस ठाणे गुन्हे शोध व खंडणी विरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कामगिरी केली.