Nashik Crime : नाशिकच्या गंजमाळमध्ये जाळपोळीची मालिका सुरूच; तीन महिन्यांत पाचवी घटना
Incident Overview: Bikes Set on Fire in Ganjmal : गंजमाळ परिसरात मध्यरात्री दुचाकींना आग लावून जाळपोळ करण्यात आली. सराईत गुन्हेगार सोनू बेग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही तीन महिन्यांत घडलेली पाचवी घटना आहे.
जुने नाशिक: गंजमाळ परिसरात जुन्या वादातून एका संशयिताने दोन दुचाकींना आग लावून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू बेग (रा.गंजमळा) असे संशयिताचे नाव आहे