गरबा-दांडियाच्या तालावर जळगावकर थिरकले

गरबा-दांडियाच्या तालावर जळगावकर थिरकले
Published on: 
NSK26H32562 (फोटो चार कॉलम वापरावा) जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त गरबा खेळताना महिला. --- शीर्षकक्‍ गरबा-दांडियाच्या तालावर जळगावकर थिरकले पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी रोषणाई अन् उत्साहाने नवरात्रोत्सवाला रंगत सकाळ वृत्तसेवा जळगाव,ता.१५ : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाने शहरातील वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले असून, देवीच्या आराधनेसोबतच गरबा आणि दांडियाच्या तालावर तरुणाईसह आबालवृद्धही थिरकताना दिसत आहेत. आकर्षक रोषणाई, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि संगीताच्या ठेक्यावर रंगणाऱ्या गरबा-दांडियामुळे शहरातील विविध मंडळांचे परिसर गजबजले आहेत. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असतानाच रात्रीच्या वेळी गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांना विशेष रंगत येत आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा संगम. याच उत्सवात गरबा आणि दांडियाने सांस्कृतिक रंग भरले आहेत. नऊ दिवसांच्या या उत्सवात महिला, युवती आणि तरुण पारंपरिक पोशाख परिधान करून गरबा-दांडियात सहभागी होत आहेत. त्यामुळे शहरातील नवरात्रोत्सवाचे वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले आहे. पारंपरिक वेशभूषेचे आकर्षण गरबा-दांडियासाठी महिला आणि युवतींकडून रंगीबेरंगी घागरा-चोळी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक केशरचना यांना पसंती दिली जात आहे. तरुणाईमध्ये कुर्ता, केडियू आणि पारंपरिक पोशाखांचे आकर्षण दिसून येत आहे. विविध रंगांच्या वेशभूषेमुळे गरबा स्थळांवर उत्सवी वातावरण निर्माण होत आहे. पारंपरिक पोशाखांसोबतच आकर्षक मेकअप आणि नवनवीन शैलींचीही चर्चा होत आहे. चौकट संगीताच्या ठेक्यावर फेर धरत जल्लोष गरबा आणि दांडियासाठी खास संगीताची व्यवस्था केली जात असून, पारंपरिक गुजराती गीतांसह लोकप्रिय गाण्यांच्या तालावर सहभागी फेर धरत आहेत. सुरुवातीला संथ लयीत सुरू होणारा गरबा हळूहळू वेग घेतो. त्यानंतर दांडियाच्या तालावर एकमेकांशी ठेका जुळवत सहभागी उत्साहाने नृत्य करतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण या आनंदात सहभागी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com