Fire Accident News : नामपूरला अंगणवाडीत गॅसने घेतला पेट

Material consumed in fire caused by gas flare in Anganwadi Center No. 2 near water tank.
Material consumed in fire caused by gas flare in Anganwadi Center No. 2 near water tank.esakal

नामपूर (जि. नाशिक) : येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये शनिवारी (ता. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास पोषण आहार शिजवत असताना गॅसने अचानक पेट घेतल्याने भडका उडाला. त्यात अंगणवाडी केंद्रातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळून कोणतीही जीवित्तहानी झाली नाही. (Gas caught fire in Anganwadi in Nampur Nashik Fire Accident Latest Marathi News)

Material consumed in fire caused by gas flare in Anganwadi Center No. 2 near water tank.
Nashik : गावठाणातील नागरिकांची मालमत्ता रस्त्यावर

येथील पाण्याच्या टाकीजवळ एकाच आवारात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पत्र्याच्या इमारतीत दोन अंगणवाडी केंद्र कार्यान्वित आहेत. अंगणवाडी केंद्रात जागतिक हात धुवा दिन कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक असल्याने कार्यकर्ती, मदतनीस यांची कामाच्या नियोजनाबाबत धावपळ सुरू होती. त्याचवेळी अचानक अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये गॅसने पेट घेतल्याने एकच आरडाओरड सुरू झाला. उपसरपंच ज्ञानदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत, गणेश सावंत, अंगणवाडी सेविका संगीता मोरे, अनिता बैरागी, मदतनीस स्वाती सोनवणे आदींनी गोणपाट आणून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

आगीत स्टीलचे कपाट, लोखंडी पेटी, पिण्याच्या पाण्याचा पिंप, कुकर, खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाले. नळीतून गॅसची गळती होत असल्याने अंगणवाडी केंद्राला आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांना गेल्या महिन्यात गॅस शेगड्यांचा पुरवठा करण्यात आला होता. घटनेनंतर जायखेड्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, बागलाणचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र भामरे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भैय्यासाहेब सावंत, तलाठी, ग्रामविकास अधिकारी आदींनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

Material consumed in fire caused by gas flare in Anganwadi Center No. 2 near water tank.
Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com