गौरव नगरात समस्यांचा विळखा; नालेसफाईअभावी आरोग्य धोक्यात

गौरव नगरात समस्यांचा विळखा; नालेसफाईअभावी आरोग्य धोक्यात
Published on: 
टुडे ३ : सेकंड मेन SK26H32043 जळगाव : गौरव नगरात खुल्या भुखंडावर वाढलेले गवत. -------------- NSK26H32045 गौरव नगरातील कच्चे रस्ते. ------------ NSK26H32046 मुख्य रस्त्यावर पडलेला कचऱ्याचा ढिग. लोगो : नव्या वस्त्या, जुन्याच समस्या --- शीर्षक गौरव नगरात नालेसफाईअभावी आरोग्य धोक्यात वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव; गल्ल्यांमध्ये घंटागाडी फिरकेना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील गौरव नगर विस्तारित वस्तीमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा अभाव जाणवत असून, परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच मोकळ्या जागा आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गौरव नगर परिसराचा विस्तार वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधांमध्ये सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे. परिसरातील नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था परिसरातील मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडा आणि काही अंतर्गत भागांत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गवतामध्ये कचरा साचण्याबरोबरच डास आणि इतर कीटकांचा उपद्रव वाढण्याची भीती आहे. गौरव नगरातील काही अंतर्गत गल्ल्यांमध्ये रस्त्यांची समस्या कायम आहे. घंटागाडी येईना परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. गौरव नगरातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी नागरिकांना कचरा दूर नेऊन टाकावा लागतो, तर काही ठिकाणी कचरा साचून राहण्याची शक्यता असते. चौकट महापालिकेने लक्ष देण्याची गरज नालेसफाई, वाढलेले गवत काढणे, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि घंटागाडीचे नियमित नियोजन या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. केवळ मुख्य रस्त्यांवरील स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता विस्तारित वस्तीतील अंतर्गत भागांमध्येही नियमित स्वच्छता आणि कचरा संकलन व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. कोट गौरव नगरातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये घंटागाडी नियमित येत नाही. नाल्यांची साफसफाई होत नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. परिसरात गवत आणि झाडाझुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांचा त्रास होण्याची भीती आहे. महापालिकेने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित नालेसफाई, गवत काढणे आणि प्रत्येक गल्लीमध्ये घंटागाडीची व्यवस्था करावी. - ज्ञानेश्वर लेकुरवाळे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com