ॲंकर
------------
NSK26H31148
जळगाव : गंधार कला मंडळातर्फे आयोजित ‘एक होते गदिमा’ या विषयावरील अक्षर गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी काव्य व साहित्यप्रेमी.
------
‘एक होते गदिमा’ कार्यक्रमात स्मृतींना उजाळा
----------
गंधार कला मंडळातर्फे काव्य, गीतांद्वारे रंगला अक्षरगप्पांचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : येथील गंधार कला मंडळातर्फे ‘एक होते गदिमा’ हा अक्षरगप्पांचा कार्यक्रम नुकताच झाला. यात साहित्यप्रेमींनी ग. दि. माडगुळकर यांच्या कविता, गाणी सादर केली. त्यानंतरही उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.
या कार्यक्रमात तुला पाहते रे, एक धागा सुखाचा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख अशा अनेक रचना गदिमांच्या शब्दांच्या पेरणीत अमर झाल्या. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यांसह गदिमांचे अनेक पैलू गंधार कला मंडळातर्फे झालेल्या अक्षरगप्पात उलगडले.
कार्यक्रमाची सुरवात नीळकंठ कासार यांनी गायलेल्या ‘गा बाळांनो गीतरामायण’ या गिताने झाली, तर गदिमा रचित राम कथा म्हणजे नवरसांचा कधीही न आटणारा झरा आहे, असे दीपा देशपांडे यांनी सांगितले. आसावरी जोशी यांनी त्यांच्या बालगीत, लावणी, प्रेम गीत व इतर गितांचे सौंदर्य स्पष्ट केले. नरेंद्र पाटील यांनी गदिमांचे चित्र साकारून त्यांना आदरांजली वाहिली. वसुधा राजहंस यांनी त्यांचा जीवन परिचय, मिनल कुलकर्णी यांनी गदिमांची लेखन शैली कथन केली. सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले.
१४-१
यांचा होता सहभाग
या अक्षरगप्पांत प्रकाश पाटील, मनीषा पापरीकर, मीना बियाणी, सुचेता नेवे, शरद पांडे, वरदा देशमुख, गोविंद बावने, स्वरा पाठक, नेत्रा सोनार, अविनाश चंद्रात्रे, उमेश कुलकर्णी, विलास देशमुख, पानाचंद चौधरी यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.