(दोन कॉलमात बातमी आवश्यक)
रायसोनी महाविद्यालयास
‘फोर-स्टार’ रेटिंगचा बहुमान
उपशिर्षक
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून गौरव
जळगाव, ता.७ : शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल अंतर्गत कार्यरत इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ‘फोर-स्टार रेटिंग’ प्राप्त झाले आहे.
नवोपक्रम, स्टार्टअप, उद्योजकता आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचारांना चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रभावी कामगिरीची दखल घेत उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक व औद्योगिक समस्यांवर उपाय शोधणे आणि उद्योजकतेच्या संधी ओळखणे, यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. हॅकेथॉन, नवोपक्रम स्पर्धा, स्टार्टअपविषयक उपक्रम तसेच विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उल्लेखनीय कामगिरी ही या प्रयत्नांची फलश्रुती आहे.
----
NSK26H31640 (प्रीती अग्रवाल)
कोट..
महाविद्यालयाला मिळालेले फोर-स्टार रेटिंग हे आमच्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि संपूर्ण संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना, संशोधनवृत्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकतेचा दृष्टिकोन विकसित करणे हा आमच्या शैक्षणिक वाटचालीचा महत्त्वाचा भाग आहे.
- प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल
संचालिका