सोयगाव- सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड येत आहेत. अलीकडेच ‘गिबली फोटो’ हा ट्रेंड जोरदार गाजत आहे. सोशल मीडियावर अनेक जण आपले फोटो गिबली अॅनिमेशनच्या शैलीत बदलून शेअर करीत आहेत. या ट्रेंडने केवळ सामान्य लोकच नव्हे, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींनाही आकर्षित केले आहे.