Darna River Pollution
sakal
घोटी: दारणा नदीत रोज पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्येचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडले जात आहे. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थेअभावी दारणा नदी आज प्रदूषणाच्या कडेलोटावर उभी असून, याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागले आहेत. परिसरातील जलस्रोतांचेही प्रदूषण होत आहे. यामुळे पिकांवरही परिणाम होत आहे.