Igatpuri News : इगतपुरीचे 'प्रशासन' वाऱ्यावर! नवी इमारत १२ वर्षांपासून धूळखात, जुन्या कार्यालयांसाठी जनतेची पायपीट
Scattered Government Offices Create Administrative Chaos in Igatpuri : शासकीय कार्यालये एका ठिकाणी असण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना एकाच कामासाठी तालुकाभर येरझाऱ्या घालाव्या लागत आहेत. वेळ, पैसा आणि श्रमाचा प्रचंड अपव्यय होतो.
घोटी: इगतपुरी तालुक्यातील प्रशासन अतिशय विस्कळित अवस्थेत असून, शासकीय कार्यालये एका ठिकाणी असण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना एकाच कामासाठी तालुकाभर येरझाऱ्या घालाव्या लागत आहेत.