घोटीत तरुणावर चाकूहल्ला; तीन संशयित आरोपी दोन तासांत ताब्यात

घोटीत तरुणावर चाकूहल्ला; तीन संशयित आरोपी दोन तासांत ताब्यात
Published on: 
घोटीत तरुणावर चाकूहल्ला तीन संशयितांना दोन तासांत अटक सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. ९ : मोटारसायकलवरून घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून शिवीगाळ करत चाकूने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. ९) मध्यरात्री आंबेडकरनगर, परिसरातील बुद्धविहारासमोर घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले असून, एक आरोपी विधिसंघर्षित आहे. याबाबत अभिजित भागा दोंदे (वय २२, रा. आंबेडकरनगर, घोटी) यांनी घोटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार निखिल नितीन नेटावटे, (रा. आंबेडकरनगर, घोटी) आणि आकाश राजेंद्र शिरसाट (रा. नांदगाव बंधारा, हल्ली रा. कुर्ला पश्चिम, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी अभिजित दोंदे व त्यांचा आतेभाऊ दक्ष दत्ता सोनवणे मोटारसायकलवरून घोटीहून आंबेडकरनगरकडे जात असताना बुद्धविहारासमोर त्यांची मोटारसायकल अडवली. या वेळी एकाने दक्ष सोनवणे यांच्यावर चाकूने वार केला. तर दुसऱ्याने चाकूने चेहऱ्यावर वार करून जखमी केले. तिसऱ्या संशयितानेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत तीनही संशयितांना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी विधिसंघर्षित आहे. घटनास्थळी शांतता असून बंदोबस्त कामी दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सागर सौदागर, अंमलदार गणेश देवकर, राहुल गांगुर्डे, प्रकाश कासार यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.