नाशिक- गहाण ठेवलेली दुचाकी परत मिळवून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारण्यासाठी आलेल्या घोटीच्या पोलिस हवालदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला पाहतच धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात संशयित हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.