Ghoti Toll Naka
sakal
घोटी: केवळ दारू पिण्यासाठी एक हजार रुपये दिले नाहीत, या कारणावरून घोटी टोल नाक्यावरील एका हॉटेलसमोर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित रिंकू हरदिप चौधरी, संशयित सिद्धार्थ केदार यांना दोन तासात पोलिसांनी अटक केली असून एक फरारी आहे.