नाशिक - चौदावर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने सहा जणांना जीवदान मिळाले आहे. कुटुंबाचा हा निर्णयाने ग्रामीण भागातील लोकांसाठी आदर्श निर्माण करणारी ठरला. .गोलवाड (ता. बागलाण) गावातील विकास यशवंत महाले (वय १४) याचा अपघात झाला. त्यास उपचारासाठी मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी विकासला ‘ब्रेन डेड’ घोषित केले.त्यानंतर अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी विकासच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. खडतर व कष्टकरी पार्श्वभूमी असलेल्या महाले कुटुंबीयांनी अशा परिस्थितीत मन खंबीर करीत अवयव दानाचा निर्णय घेतला..त्यानंतर प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून अवयव दानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यातून विकासचे दोन मूत्रपिंड आणि यकृत ग्रीन कॉरिडॉर तयार करून पुणे येथील विविध रुग्णालयात पाठविण्यात आले..तसेच त्याचे दोन्ही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत, तर त्वचा त्वचापेढीत दान करण्यात आली. या प्रक्रियेसाठी वैद्यकीय पथके, प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्या प्रयत्नातून ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयव वेळेत पोहोचविणे शक्य झाले व अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.