भाऊसाहेब गोसावी: चांदवड- गावासाठी स्मशानभूमीत शेड नसल्याने देवळा- चांदवडच्या हद्दीवरील गिरणारे गावात रविवारी (ता. ६) भावगिरी गोसावी यांच्यावर प्लॅस्टिकचा कागद धरून भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागले. गावात गोसावी समाजाच्या स्मशानभूमीत कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांवर ही वेळ आली. प्लॅस्टिक कागद डोक्यावर धरूनच सर्व धार्मिक विधी करण्यात आले. यामुळे गोसावी समाजाच्या बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया देत स्मशानभूमीत शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.