नाशिक : वडिलांचे खोटे LC देणाऱ्या युवतीला मिळाले जातप्रमाणपत्र

Fake caste certificate
Fake caste certificateesakal
Updated on

नाशिक : एकीकडे विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी (Caste Validity Certificate) दमछाक करावी लागत असल्‍याची स्‍थिती आहे. तर दुसरीकडे वडिलांचा शाळा सोडल्‍याच्या बनावट दाखल्याच्‍या (LC) आधारे जातप्रमाणपत्र प्राप्त केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लिपिक असलेल्‍या रविराज रायकर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संबंधित युवतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

एकटीचा सहभाग, की रॅकेट सक्रिय

पूजा भोला भगवाणे (वय २०) या युवतीने महाराष्ट्र शासनाच्‍या आपले सरकार या पोर्टलद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत तिने वडिलांचा शाळा सोडल्‍याचा खोटा दाखला हा १९५० चा पुरावा म्‍हणून सादर केला. त्‍याआधारे तिने जात प्रमाणपत्र प्राप्त करुन या प्रमाणपत्राचा वापर विविध ठिकाणी केला असल्‍याचे फियादित म्‍हटले आहे. दरम्‍यान संबंधित युवती सध्या मुंबईत शिक्षण घेत असल्‍याचे समजते. तिच्‍याविरोधात फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

Fake caste certificate
घरी केलेल्या कोरोना टेस्टमधून ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधता येतो का? वाचा

या घटनेने प्रमाणपत्र वितरण यंत्रणेतील त्रृटी चवाट्यावर आल्‍या आहेत. एका व्‍यक्‍तीने यासंदर्भात संशय व्‍यक्‍त केल्‍यानंतर या घोटाळ्याचा भांडाफोड झाला. परंतु या गैरप्रकारात संबंधित युवती एकटी सहभागी आहे की, तिच्‍या वडिलांनीही तिला साथ दिली हे अधिक तपासातून स्‍पष्ट होऊ शकेल. अशा स्‍वरुपाचे गैरप्रकार घडविणारे रॅकेट सक्रिय असल्‍याचीही शक्‍यता व्‍यक्‍त होते आहे. संबंधित युवतीला अटक करत, पुढील पोलिस तपासानंतरच अधिकची माहिती समोर येऊ शकणार आहे.

Fake caste certificate
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्‍सिन! ऑन द स्पॉट मिळेल लस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

aaple sarkar seva kendra
Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District
Ambad village drinking water shortage
Minor student blackmail case in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com