Nashik Sports Update : नाशिकच्या मुलींची खो- खो स्पर्धेत उप उपांत्य फेरीत धडक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rituja of Nashik dismisses the player from Dhule.

Nashik Sports Update : नाशिकच्या मुलींची खो- खो स्पर्धेत उप उपांत्य फेरीत धडक!

नाशिक : आज संध्याकाळी मुलींचा उप उपांत्य पूर्व फेरीत नाशिकच्या मुलींचा सामना धुळ्या बरोबर झाला. सलग तिसऱ्यांदा नाणेफेक हरल्यानंतर आपल्या धारधार आक्रमणाच्या जोरावर नाशिकने धुळ्याचे 22 गडी बाद केले. (Girls of Nashik reached sub semi finals of Kho Kho tournament Nashik Sports Update)

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

हेही वाचा: Gujarat Assembly Elections : गुजरातच्या निवडणुकीत नाशिकच्या BJP आमदारांचा डंका!

नाशिक कडून मनिषा पडेर 7 गडी, ऋतुजा सहारे आणि निशा वैजल प्रत्येकी तीन गडी, वृषाली भोये आणि सुषमा चौधरी प्रत्येकी दोन गडी,दिक्षा सिताड, सोनाली पवार,तेजल सहारे प्रत्येकी एक गडी यांनी आक्रमणाची धुरा सांभाळली. तर संरक्षण करतांना पहिल्या डावात निशा वैजल पाच मिनिट 45 सेकंदाचा खेळ करुन ती निवृत्त झाली. ज्योती मेढे हिने नाबाद तीन मिनिट 15 सेकंदाचे संरक्षण केले.

मध्यांतराला नाशिक संघाकडे 21 गुणांची अजेय आघाडी होती. दुसऱ्या आक्रमणात सुध्दा धुळे संघाला एक गुण मिळाला तो सुध्दा सरीता दिवा 4 मिनिट 30 सेकंद खेळून निवृत्त झाली. धारधार आक्रमणा बरोबर मनिषा पडेर हिने नाबाद 4 मिनिट तीस सेकंदाचा पळतीचा खेळ करून आपल्या अष्टपैलू खेळाची ओळख दिली. सलग तिसरा सामना नाशिक संघाने एक डाव आणि वीस गुणांनी विजयी झाला.

हेही वाचा: Nashik News: दुष्काळी माळरानावरील सीताफळ पोचले बांगलादेशला; खिर्डीसाठेच्या तरुण शेतकऱ्याची करामत

टॅग्स :Nashiksports