मालेगाव शहर- उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणाने अर्ध्या जुलैत पन्नाशी ओलांडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्के जलसाठ्यात वाढ झाली. गिरणा पाणलोट क्षेत्रातील चणकापूर, पुनद, हरणबारी, ठेंगोडा ही धरणे ओव्हरफ्लो झाली. या धरणांतून झालेल्या पाण्याच्या विसर्गाने गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली आहे.