गिरणा, तापी कोरड्या

गिरणा, तापी कोरड्या
Published on: 
नद्यांचा प्रवाह बंद; गिरणा, तापी कोरड्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ ; खानदेशात यंदा सप्टेंबरमध्येच पाऊस बंद झाला. नंतर पाऊस झालाच नाही. गिरणा, तापी, अनेर नद्या ऑगस्टमध्ये प्रवाही होत्या. पण सप्टेंबरमध्ये प्रवाह बंद होऊ लागले. आजघडीला गिरणा, अनेर नद्या कोरड्या झाल्याची स्थिती आहे. अनेक भागांत नद्यांमध्ये वाळू, माती टाकून कच्चे पूल, रस्ते तयार करून वाहतूक सुरू झाली आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पातून अनेक दिवसांपासून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरणातूनही विसर्ग सप्टेंबरमध्येच बंद झाला आहे. त्यामुळे नदीत पाणी नाही. जेथे मोठे खड्डे, डोह आहेत, तेथेच तापी, गिरणा नदीत पाणी आहे. यंदा ऑगस्टमध्ये फक्त दोनच दिवस काही भागात पाऊस झाला. नंतर जोरदार पाऊस आलाच नाही. पाऊसमान कमी राहिल्याने नद्यांच्या उगमक्षेत्रात स्रोत नव्हते. मागील हंगामात किंवा पावसाळ्यात अनेक नद्या नोव्हेंबरमध्येही प्रवाही होत्या. परंतु यंदा प्रमुख नद्या कोरड्याठाक पडल्या असून, नदीकाठी काही दिवसातच टंचाई तयार होईल, अशी चिंता आहे. अनेक गावांत जानेवारीतच टंचाई होईल. नद्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात येईल, असेही दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.