सिन्नर- भोकणी (ता. सिन्नर) ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण वाघ यांनी पर्यावरण रक्षणासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत गावात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी त्यांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. यात एक किलो प्लास्टिक जमा केल्यावर ग्रामस्थांना अर्धा किलो साखर दिली जाणार आहे.