esakal | एक चमत्कार आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली!
sakal

बोलून बातमी शोधा

grandmother

एक चमत्कार आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली!

sakal_logo
By
संदीप पवार

डीजीपी नगर (नाशिक) : एक आजी चार चाकी गाड्यांचे समोर येत आत्महत्येचा प्रयत्न (senior citizen trying to suicide) करत होत्या. आजींना विचारल्यास समजले की, मोठ्या प्रमाणावर घरी आणि परिसरात छळ चालू होता. पण असे काही घडले आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली.या घटनेची सर्वत्र चर्चा असून त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.(Giving life to elderly grandmother)

एक चमत्कार आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली!

वेळ सकाळची...नाशिकच्या श्रीराम विद्यालय नजीक रहदारीच्या रस्त्यावर सेवा कुंजच्या बाहेर एक आजी चार चाकी गाड्यांचे समोर येत आत्महत्येचा प्रयत्न करत होत्या. हे लक्षात येता कौशल वाखारकर या गृहस्थांनी गाडी बाजूला लावून.त्या आजींकडे जावून आणि आजींना बाजूला केलं आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, नक्की झालं काय आहे आज्जी? का तुम्ही गाड्या समोरून आत्महत्येचा प्रयत्न करत आहात?. आजी कोणत्या ही प्रकारच्या बोलायच्या मनस्थितीत नव्हत्या. परंतु काही वेळ आजींना बाजूला थांबून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजी बोलल्या....

हेही वाचा: १८ ते ४४ वयोगटांसाठी महापालिकेचा स्वखर्चाने लसीकरणाचा प्रयत्न : महापौर

आजींचा घरी आणि परिसरात छळ

आजी यांचा मोठ्या प्रमाणावर घरी आणि परिसरात छळ चालू होता, आजींना मानसिक त्रास देण्याचा काम आजूबाजूचे लोक तसेच कुटुंबीय करत होते. वाखारकर यांना आजींची कैफियत ऐकूण खूप वाईट वाटले. मग त्यांनी स्थानिक पोलीस चौकी पंचवटी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक भगत यांच्याशी या विषयावर चर्चा केली. आणि त्यांच्या मनात एक कल्पना आली व पोलीस अधिकारी अशोक भगत यांच्या मदतीने आजींना आपण आश्रमात पाठवूया व त्यांची तिकडे व्यवस्था लावूया. संकल्पना अशोक भगत यांना पटली व त्यांनी देखील मदतीचा हात पुढे करीत सुख समृद्धी वृद्धाश्रम या ठिकाणी आजींना हलवण्याचा प्रयत्न केला. आणि तो यशस्वी झाला.

हेही वाचा: ई-पाससाठी बनावट कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र; सायबर पोलिसांची कारवाई

सर्वत्र चर्चा

वृद्धाश्रमचे संचालक संतोष वैद्य यांनाही व्यथा सांगितल्यावर त्यांनी सहकार्य करत त्यांच्या वृद्धाश्रमात आजींना थारा दिला व आजींची व्यवस्था करून दिली. यावेळी सतीश निकम यांचे ही सहकार्य लाभले. सर्व कार्य सुखरूप पार पडल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कौशल वाखारकर यांना समाधान पावल्यासारखे वाटले. कौशल वाखारकर यांच्या सामाजिक बंधीलकीतून वयोवृध्द आजींना जीवदान मिळाले असून पंचवटी पोलिसांच्या मदतीने आजींना सुखरूपपणे वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले असून वाखारकर यांनी केले. या कार्याची सर्वत्र चर्चा असून त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

loading image
go to top