धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....
--
फोटो क्रमांक : 32524
विसरणे (ता. धुळे) : जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्याना स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करताना शिक्षक, कर्मचारी.
--
जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिन उत्साहात
--
प्रात्यक्षिकांद्वारे पटवून दिले आरोग्यासाठी हात धुण्याचे महत्त्व
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालये, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये १५ ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हात धुण्याचे आरोग्यदायी फायदे आणि महत्त्व पटवून देण्यात आले.
हात धुण्याच्या योग्य सवयींमुळे आजारांचा प्रसार रोखता येतो, याबद्दल ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळांमध्ये साबणाची उपलब्धता व्हावी, यासाठी गावांमध्ये साबण गोळा करण्यासाठी विशेष रॅली काढण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रात्यक्षिकांद्वारे योग्य पद्धतीने हात धुण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हास्तरीय उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी परिश्रम घेतले.