ॲंकर
टुडे शहर पान तीनसाठी
NSK26H32884
असोदा (ता.जळगाव) : सार्वजनिक विद्यालयात मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी श्रीकांत हारकर. मंचावर मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागूल, दिलीप अत्तरदे, एल. जे. पाटील आदी.
--------------------------
ध्येयपूर्तीचा मार्ग निवडताना फसवणूक करू नका
------
अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर : सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१८ : जीवन ही एक स्पर्धा आहे. जीवनात आपला आदर्श निश्चित करा. तो ठरवा. त्या आदर्शाचे व्यवस्थित निरीक्षण करा व निरिक्षणातून आपला आदर्श योग्य की अयोग्य हेदेखील निश्चित करा. समज छोटी असली तरी आपलं ध्येय मोठे असणे गरजेचे आहे. मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण मार्गक्रमण करा. एआयच्या युगातही माणूस परफेक्ट आहे. आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी समाजाची व स्वतःची फसवणूक करू नका, असे मत अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘स्पर्धा परीक्षा आणि जीवनाचे ध्येय’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून श्री. हारकर बोलत होते. ते म्हणाले की, जीवनात यशस्वी असे ध्येय ठेवत असताना आपल्या जगण्याच्या दिशादेखील निश्चित करा. पुढील युगात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. परीक्षेतला प्रामाणिकपणा तुमचे भविष्य घडवत असतो. स्वतःशी प्रामाणिक राहा, समाजाशी प्रामाणिक राहा. हे होत असताना आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकाला व शाळेला मात्र, आयुष्यात विसरू नका.
अध्यक्षस्थानी विद्यार्थी यश पाटील होते. प्रास्ताविक योजना कोल्हे या विद्यार्थिनीने केले. चरणीका चौधरी, मोक्षा पाटील, प्रियांका वाणी, समीक्षा चौधरी यांनी ईशस्तवन म्हटले व स्वागतगीत खुशी कोळी, मयुरी माळी यांनी सादर केले. मान्यवरांचा परिचय एस. के. राणे राजपूत यांनी करून दिला. संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. विचार मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, संचालक दिलीप अत्तरदे, पर्यवेक्षक एल. जे. पाटील उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संघदीप मोरे, रईस पिंजारी, सुमेध बिऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी वानखेडे यांनी केले. वेदांत माळी यांनी आभार मानले.