Diwali 2023 : वसुबारसेला गोदाघाटावर गोदा दीपोत्सव 2023; श्रीरामकृष्ण संस्थान व मनपाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

Vasubaras 2023
Vasubaras 2023esakal

Diwali 2023 : श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान तथा जागृत नाशिक-जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांच्या संकल्पनेतून वसुबारसेला गुरुवारी (ता. ९) नाशिकच्या गोदावरी नदीवरील गांधी तलाव तथा गोदाघाटावर ११ हजार दीप प्रज्वलित करण्याचा उपक्रम श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान तसेच नाशिक महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.

नाशिकची भूमी रामायणातील महत्त्वाच्या घटना व कालखंडाची साक्षीदार राहिलेली आहे. यामुळे अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर ज्याप्रमाणे दीपोत्सव साजरा होतो, तसा शहरातील गोदावरीच्या तीरावर लोकसहभागातून भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर व स्वामी श्रीकंठानंद यांची भेट होऊन आयुक्तांनी या उपक्रमात संयुक्त विद्यमाने सहभागी होण्यास मान्यता दिली. (Goda Deepotsav 2023 organized at Vasubaras Goda Ghat nashik news)

कार्यक्रमाद्वारे पर्यावरण, सामाजिक एकात्मता, प्रदूषण निर्मूलन व व्यसनाधीनतेविरुद्ध संघर्षाबाबतही संदेश देण्यात येणार आहे. दीपोत्सवाचा हा उपक्रम सूत्रबद्ध पद्धतीने व अनुशासनपूर्वक व्हावा, यासाठी दीपोत्सवात प्रत्यक्षपणे सहभागी होऊन दिवे लावण्यासाठी नावाची नोंदणी करून ओळखपत्र मिळविणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या नाशिककरांनी कार्यक्रमाला येताना पर्यावरणपूरक मातीच्या पणत्या, कापसाची वात, तेल तसेच दिवे लावण्यासाठी मेणबत्ती व माचीस सोबत आणून या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे.

तसेच, दीपोत्सवासाठी लागणारे हे सामान देण्याची इच्छा असल्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट (तिसरा मजला, अनंत गौरव चेंबर्स, इंडियन बँकेच्या वर, मेहेर सिग्नल, नाशिक) येथे संपर्क साधावा. गोदा दीपोत्सव २०२३ नोंदणीसाठी ८६३७७९०१९६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्वामी श्रीकंठानंद यांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

- नियोजित दिवस : वसूबारस, गुरुवारी (ता. ९).

- नियोजित ठिकाण : गोदातीरावरील गांधी तलाव तथा गोदाघाट.

- सकाळी गोदातीरावरील गांधी तलाव परिसराची महापालिकेच्या यंत्रणेद्वारे स्वच्छता.

Vasubaras 2023
Diwali Precaution : आली दिवाळी.. सांभाळा घरदार! सुट्यांमध्ये बाहेर जाताना घ्या काळजी

- दुपारी चारला आयोजक व स्वयंसेवक गोदातीरी उपस्थित होतील.

- म्युझिक सिस्टिमद्वारे श्रीरामांची गीते व भजने सुरू होतील.

- चार ते सायंकाळी सहापर्यंत दिव्यांमध्ये तेल-वात घालून त्यांची योग्य मांडणी केली जाईल.

- सव्वासहाला दीप प्रज्वलित करण्यास सुरवात होईल.

- सातला सामूहिक रामरक्षा पठण होईल. त्यानंतर एकता, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व

निर्व्यसनी राहण्याबाबत सामुदायिक संकल्प करण्यात येईल.

- कार्यक्रमाच्या ठिकाणी गरजू बांधवांसाठी फराळाचे पदार्थ संकलित केले जातील.

- रात्री दहाला कार्यक्रमाची सांगता होईल.

- दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेच्या यंत्रणेद्वारे परिसराची स्वच्छता केली जाईल, त्यास सहाय्य करण्यास काही स्वयंसेवकही उपस्थित राहतील.

Vasubaras 2023
Diwali 2023: दिवाळीत पणत्या लावताना या गोष्टींची घ्या काळजी; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com