SNR26B23168
सिन्नर ः गोदावरील कालव्यावर सिमेंट अस्तरीकरण काम बंद पाडण्यासाठी जमा झालेले शेतकरी.
------------------
गोदावरी कालव्याचे काम
शेतकऱ्यांनी बंद पाडले
------------
सिमेंट अस्तरीकरणाला मेढी येथे विरोध
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १९ ः गोदावरी उजव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. मेंढी येथे अस्तरीकरण सुरु असताना शेतकऱ्यांनी हे काम बंद केले. सिमेंटच्या अस्तरीकरण कोणत्याही स्थितीत होवू देणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
सोमनाथ चांदगुडे, काका नाजगड, आबासाहेब जाधव, विनायक घुमरे, गौरव सोनवणे, राजेंद्र वाकचौरे, विठ्ठल जाधव आदींसह शेतकऱ्यांनी हे काम शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे सांगितले. अभियंता सहाणे यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. काम बंद पाडल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचारी माघारी फिरले.
कालव्यातून पाणी सोडल्यानंतर भूजलपातळी सुधारण्यास त्यामुळे मदत होते. शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासह शेतालाही ते लाभदायी ठरते. अस्तरीकरण झाल्यास शेतकरी उध्वस्त होणार आहेत. ब्रिटिश काळापासून हा कालवा आजपर्यंत सुरळीत सुरु आहे. कालवा फुटू नये यासाठी मातीच्या भरावासह इतर उपायही करता येतात. त्यासाठी सिमेंट अस्तरीकरणच का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. २४ किलोमीटरचे मंजूर असलेले हे काम शेकडो शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे ठरेल. त्यावर जलसंधारण विभागानेही शेतकऱ्यांचा विचार करुन या कामाबाबात पुनर्विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भूजल पातळी सुधारल्याने कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न मिटतो.
पाण्याचे स्रोत बंद होऊन विहिरींची भूजल पातळीही खालावणार आहे. त्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होणार नाही. त्याचा पशुपालनावर व पर्यायाने शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर दुष्परिणाम होणार आहे. एकूणच अस्तरीकरण शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने हे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
१६-१
चौथ्या दिवशीही काम पाडले बंद
या अगोदर जलसंधारण विभागाने कारवाडी येथे काम बंद पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारवाडीत, तिसऱ्या दिवशी हांडेवाडी शिवारात काम बंद करण्यात आले. मेंढी येथे सोमवारी (ता.१९) अस्तरीकरण कामास सुरुवात करताच शेतकऱ्यांनी जमा होत त्यास विरोध केला.