पान पाच मेन
--------------------
फोटो असलेले कोट ठळकपणे सर्वात वर वारपणे
--------------------
32988 आठ कॉलम करणे
----------------
नाशिक : ‘गोदा एपीक ट्रेल रन’ या अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करताना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील आदी मान्यवर.
‘गोदा एपीक ट्रेल रन’ स्पर्धेच्या लोगोचे दिमाखात अनावरण
‘सकाळ’ व ’जी-५ फाउंडेशनतर्फे २० डिसेंबरला अर्धमॅरेथॉन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१९ : गंगापूर धरणालगतच्या वृक्षांमधून पायवाटेने चालण्याचा अनुभव घेत पुढे चिखलात धावण्याचा मिळणारा अद्वितीय आनंद अवर्णनीयच. या आनंदासोबतच रस्त्यावर येणारे अडथळे पार करण्याचे कसब पणाला लावणारी ‘गोदा एपीक ट्रेल रन’ ही अदभूत अशी अर्धमॅरेथॉन स्पर्धा नाशिककरांना पुढील महिन्यात अनुभवण्यास मिळणार आहे.
‘सकाळ’ व ‘जी-५ फाउंडेशन यांच्यातर्फे २० डिसेंबर २०२६ ला विविध गटात होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता.१९) ‘सकाळ’च्या ‘श्री कालिका प्लाझा’ येथील कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी जी-५ फाउंडेशनचे जितेंद्र गाडेकर, महेश गाडेकर, आकाश गाडेकर, श्री गाडेकर, यंग रिसोर्स ब्रिगेड फाउंडेशनचे राज हिरे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, क्रेडाईचे कृणाल पाटील, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, ललित रूंगठा ग्रुपचे संचालक अभिषेक बुवा, रोहित राजपूत, आर्या इव्होटेकचे संचालक प्रशांत बच्छाव, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ.धनंजय डुबेरकर, कर्करोगतज्ज्ञ डॉ.शैलेश बोंदार्डे, पोटविकारतज्ज्ञ डॉ.नितीन बोरसे, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.मनोज चोपडा, केळकर हॉस्पिटलच्या डॉ.पूर्वा केळकर, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अभिजित गुंजाळ, दंड ॲण्ड सन्सचे संचालक योगेश्वर दंडे, याकूब शेख, ‘नावा’ जाहिरात संघटनेचे अध्यक्ष अमोल कुलकर्णी, ‘फेम’या जाहिरात संघटनेचे अध्यक्ष रवी पवार, प्रवीण चांडक, मोतिराम पिंगळे, ‘सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर सिंह यांनी ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले. सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम उपयोगी ठरतात. सायकलिंगसाठी नाशिकचे वातावरण पूरक असून यासारखे चांगले ठिकाण दुसरे असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
महंत भक्तिचरणदास महाराज यांनी गोदावरीचे माहात्म्य सांगत आपण तिच्या सानिध्यात राहत असल्याने आपण सर्व भाग्यवान आहोत. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची असून यंदाच्या कुंभमेळ्यातून नाशिकचा सर्वांगिण विकास होत आहे. १२ ते १५ कोटी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येतील. छोट्या घटकांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन हा कुंभमेळा पार पडेल. त्याची सुरुवात ‘सकाळ’च्या या स्पर्धेपासून झाल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
ॲड.नितीन ठाकरे म्हणाले, की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. रस्त्यांची कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण होतील आणि आजवर नाशिककरांना झालेला त्रास यापुढे होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंहस्थाच्या निमित्ताने पुढील वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यातून निश्चितपणे सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. ‘सकाळ’चा हा उपक्रम त्याची सुरुवात ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अध्यात्माचा भाव आणि भारतीयत्वाचा विचार यांचा संगम असलेला नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा अभूतपूर्व ठरेल. नाशिकला जगाच्या नकाशावर येण्याची ही सुवर्ण संधी असून ‘गोदावरी नदी ही ‘ब्रॅण्ड’ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अभय सुपेकर यांनी ‘गोदा एपिक ट्रेल रन’ या स्पर्धेचा मुख्य उद्देश आणि ‘सकाळ’ घेत असलेल्या विविध स्पर्धांचे, सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली.
…
असे असेल स्पर्धेच स्वरूप
‘गोदा एपीक ट्रेल रन’ ही अर्धमॅरेथॉन स्पर्धा ३, ५, १० आणि २१ किलोमीटरमध्ये स्पर्धकांना फन रन’ ऑबस्टॅकल रन आणि अर्ध मॅरेथॉनचा अनुभव घेता येणार आहे. स्पर्धेतील २० टक्के अंतर हे सर्वसाधारण रस्त्याचे तर उर्वरित ८० टक्के स्पर्धा ही विविध अडथळे, पायवाट व चिखलातून मार्गक्रमण करणारी असेल. त्यामुळे इतर सर्वसाधारण मॅरेथॉन स्पर्धेच्या तुलनेत ही अगदी आगळी वेगळी स्पर्धा ठरणार असून यातून सहभागी स्पर्धकांचा आनंद द्विगुणित होईल. केवळ धावण्याची स्पर्धा नव्हे तर स्पर्धकांना आनंद मिळवून देणारी ही स्पर्धा ठरेल.
--------------------
32993
आदिवासी भागातील जवळपास पाच हजार युवकांना शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही आजवर पुढाकार घेतला. केवळ शिक्षणापर्यंत न थांबता या युवकांना रोजगार कसा मिळेल, याचाही विचार केला. ‘गोदा एपीक ट्रेल रन’च्या माध्यमातून युवकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. युवकांनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम रहायला हवे, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. मॅरेथॉनच्या माध्यमातून युवकांना एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास आहे.
- राज हिरे, यंग रिसोर्स ब्रिगेड फाउंडेशन
32994
नाशिक बाहेरील शहरांमध्ये मॅरेथॉनला आम्ही भेट दिल्यानंतर लक्षात आले, की आपण नाशिकमध्येही अशा स्वरूपाची स्पर्धा घेवू शकतो. त्यासाठी गंगापूर धरणालगतच्या परिसराची पाहणी केली. निसर्ग संपन्न असलेल्या या परिसरात दोन वेळा ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. चालू वर्षी ‘सकाळ’ सोबत स्पर्धा घेण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आनंद आहे.
- आकाश गाडेकर, जी-५ फाउंडेशन
32995
युवकांचे स्वास्थ्य व्यवस्थित राहिले तर त्यांना सकारात्मक मानसिकतेने कार्य करण्याची ऊर्जा मिळेल. समाजातील नकारात्मक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण फिटनेसच्या माध्यमातून सदृढ आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या उद्देशाने नाशिकमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘गोदा ट्रेल ट्रॅक’शोधला. या मॅरेथॉनचे यंदा तिसरे पर्व आहे.
- श्री गाडेकर, जी-५ फाउंडेशन
आरोग्याविषयी जनजागृती वाढत असून अर्धमॅरेथॉन स्पर्धा या युवकांना प्रेरणा देतात. ‘सकाळ’ने हाती घेतलेला हा उपक्रम नाशिककरांना निश्चितपणे आनंद मिळवून देईल.
- प्रशांत बच्छाव, संचालक, आर्या इव्होटेक
आरोग्याविषयी सजगता वाढत असताना त्याप्रमाणे आनंद देणाऱ्या स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. ‘सकाळ’ व जी-५ फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.
- किरण चव्हाण, माजी अध्यक्ष, क्रेडाई नाशिक
नाशिकच नव्हे तर राज्यातील सर्व युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. अशा प्रकारच्या स्पर्धा होवू शकतात आणि नाशिक त्यासाठी किती महत्त्वाचे ठिकाण आहे, हे या स्पर्धेतून दिसून येईल.
-गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो
आरोग्याप्रति सजग असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. त्यातून मिळणारा आनंद व मिळणारा अनुभव हा वेगळा असेल.
- डॉ.मनोज चोपडा, संचालक, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट
नाशिककरांना ही स्पर्धा वेगळा अनुभव देणारी ठरेल. या स्पर्धेची संकल्पना अत्यंत वेगळी असून या स्पर्धेला अधिकाधिक प्रतिसाद मिळेल.
- कृणाल पाटील, माजी अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो
पायी चालणे, रस्त्यावर धावणे त्याचबरोबर मार्गावरील अडथळे पार करणारी स्पर्धा सर्वसामान्य व्यक्तिींसाठी असते, ही संकल्पनाच वेगळी ठरते.
- डॉ.शैलेश बोंदार्डे, कर्करोग तज्ज्ञ
युवकांमध्ये आरोग्याविषयी सजगता निर्माण करण्याचा हा मार्ग आहे. अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून सिंहस्थाला जोड देण्याची संकल्पना वेगळी ठरते. स्पर्धा अत्यंत यशस्वी होईल.
- योगेश्वर दंडे, संचालक, दंडे ॲण्ड सन्स
निर्सगाच्या सानिध्यात धावण्याचा मिळणार आनंद वेगळा असतो. अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील विविध टप्पे स्पर्धकांना निश्चितपणे वेगळा अनुभव देतील.
- रवी पवार, अध्यक्ष, फेम
अर्धेमॅरेथॉन स्पर्धा आणि त्यातील ‘फन रन’ या नवीन स्पर्धकांना प्रेरणा देतील. तसेच युवकांना प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा ठरेल.
- अमोल कुलकर्णी, अध्यक्ष, नावा